निलंगा तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्था...
निलंगा तालुक्यातील येळणूर - गुंजरगा - सिंदखेड - निलंगा रस्त्याची दयनीय अवस्था ...
रस्ता की तळे ? रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप..
रस्त्याची झाली चाळण - चाळण...
स्थानिक लोकप्रतिनिधींचे व संबंधित प्रशासनाची डोळेझाक...
निलंगा,दि.६ (मिलिंद कांबळे)
निलंगा शहरापासून अगदी १२ ते १५ किलोमिटर अंतर असलेल्या येळणूर - गुंजरगा -
सिंदखेड -निलंगा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची चाळण - चाळण झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे प्रवाश्याना ये - जा करण्यासाठी अत्यंत जिकरीचे झाले असून खराब रस्त्यामुळे त्या भागातील जनतेच्या हाडांचे आजार वाढल्यामुळे मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
परिणामी याभागातील नागरिकांना पावसाचा अथवा अवकाळी पावसाचा एखादा सडाका जरी आला तरी त्या रस्त्यावरून चालणे कठीण होऊन जाते, इतर वेळाही कसरत करतच चालावे लागते. या गावभागात राहणाऱ्या नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याबाबत लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..
या भागातील जनतेला तालुक्यात जाण्यासाठी जवळपास १० ते १५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. या अंतरावर अनेक ठिकाणी खूप मोठं मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे.या रस्त्यात पाणी साचत आहे.त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता आहे की,पाण्याचे तळे आहे.हेही कळायला मार्ग नाही.
सदरचा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा या गाव भागातील जनतेची अबाल वृद्धांची विद्यार्थ्यांची होणारे हाल कमी करावे अशी मागणी असतानाही .हा रस्ता आहे तश्याच अवस्थेत असल्यामुळे सायकलस्वार आणि दुचाकीस्वरांची देखील परवड होत असते. यावरून रस्त्याची स्थिती सर्वसामान्यांना कळून येईल. रस्त्यावर दगड उखडून वर आले आहेत. खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे दोन चाकी वाहन तर सोडाच, पायी चालताही येत नाही. पायी चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी याभागातील अतिगंभीर रुग्णास हॉस्पिटलला घेऊन जाण्याकरिता वाहनही इकडे यायला तयार होत नाही.
रस्ताच पूर्णपणे उखडला असून जागोजागी पडलेल्या खड्यामुळे जेष्ठनागरिक, वयोवृद्ध, लहान बालके, महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी व यागावात राहणारी जनता त्रस्त झाली आहे.
Comments
Post a Comment