मंडळ अधिकारी कार्यालयासाठी...
मंडळ अधिकारी कार्यालयाच्या निर्मितीसाठी तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर...
आमदार पवार यांच्या हस्ते भूमिपूजन....
निलंगा,दि.०९
कासार सिरसीसह परिसरातील मंडळ अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे कासारसिरसी येथे मंडळ अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
या परिसरात २३ गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालये स्थापन करण्यात येणार असून यासाठी शासनाने तीन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
कासारसिरसी येथे निर्मिती करण्यात येणाऱ्या मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,माजी मंत्री बसवराज पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या समारंभाचे औचित्य साधून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकासरत्न पुरस्कार देण्यात आला. तर आमदार अभिमन्यू पवार यांना उत्कृष्ट भाषण पटू म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.त्या प्रित्यार्थ दोन्ही मान्यवरांची शहरातून भव्य मिरवणूक काढून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार पवार यांनी कासारसिरसी येथे महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
या समारंभास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
Comments
Post a Comment