निलंगा भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद प्रभारी..शेकडो प्रकरण धूळखात...
निलंगा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक भूमिअभिलेख पद प्रभारी....
शेकडो प्रकरणे धूळखात पडून..
शेतकऱ्यांचे हाल...
निलंगा ,दि.११(मिलिंद कांबळे)
निलंगा उप-अधिक्षक भुमी अभिलेख या कार्यालयात उप - अधीक्षक भूमी अभिलेख पद प्रभारी असल्यामुळे या कार्यालयाशी निगडित असलेली शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून या कार्यालयात मागील अनेक वर्षापासून उपअधीक्षक भूमिअभिलेख हे पद प्रभारी असून कर्मचाऱ्यांचीही काही पदे रिक्त आहेत.
त्यामुळे शेकडो शेतमोजनीचे व इतर शेकडो प्रकरणे ,मोजणी अर्ज गेले अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
या कार्यालयात एकूण १९ पदांची आस्थापना असतांना या कार्यालयात एकूण १३ जणांची पदे भरले आहेत तर यापैकी ०४ शिपाई पद भरलेले आहेत.तर या कार्यालयाचे प्रमुख पद असलेले
उप - अधीक्षक भूमी अभिलेख हे पद मागील अनेक महिन्यांपासून प्रभारी आहे.तर काही कर्मचाऱ्यांची संख्या ही रिक्त आहे.या कार्यालयात रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे खालील प्रमाणे आहेत.त्यात अभिलेखापाल सहाय्यक पद संख्या ०१,रिक्त पद संख्या ०१,नगर भूमापक लिपिक पदसंख्या०१रिक्तपद संख्या ०१,प्रतीलीपी लिपिक०१ रिक्त, शिपाई ०१ रिक्त तर दप्तर बंद पद ०१ पद रिक्त आहे.असे सर्व मिळून ०६ पदे रिक्त आहेत त्यामुळे कार्यालयात मोजणी अर्जाचा डोंगर झाला असून कामे होत नसल्याने या कार्यालयातुन रोज शेकडो लोक परत जात आहे.
.
भूमी अभिलेख कार्यालयातून संपूर्ण तालुक्याचा मोजणी अथवा शेत जमिनी संदर्भात कामे केली जातात. तालुक्याचा विस्तार खूप मोठा असल्याने या कार्यालयात मोजणीचे दर महिन्याला शेकडो अर्ज येत असतात. तसेच नक्कल प्रत काढण्यासाठी शेकडो अर्ज येतात. मात्र गेल्या महिन्यापासून या कार्यालयातून अर्जाचा निपटारा न झाल्याने शेकडो अर्ज मोजणी कामाचे प्रलंबित असून तेवढेच अर्ज नक्कलेसाठी प्रलंबित आहेत. यामुळे या कार्यालयात येणार्या शेतकर्यांना नुसत्या फेर्या मारावे लागत असून त्यांची कामेच होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
या कार्यालयात कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात,खटके उडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून लांबून येणारा शेतकरी शंभर दोनशे रुपये खर्च करून या कार्यालयात आल्या नंतर त्याचे काम होत नसल्याने बर्याच वेळा मनस्ताप होवून वाद विवादही होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment