थोरल्या भावाच्या मृत्युचा धक्का धाकट्या भावाला सहन झाला नाही..

थोरल्या भावाच्या मृत्यूचा धक्का धाकट्या भावाला सहन झाला नाही....

धाकट्या भावाने सोडला प्राण...

घडलेल्या घटनेने समाजमन हळहळले

निलंगा,दि.१४(मिलिंद कांबळे)

सख्खा भाऊ पक्के वैरी असे म्हणतात.तशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना घडल्याने ही म्हण प्रचलित झाली असावी. पण कुटूुंबातील आपले-
पणा कधीकधी मनाला चटका लावून जातो. त्यातून मन हेलावणाऱ्या घटना घडतात. आजारी असलेल्या आपल्या थोरल्या भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच धाकट्या भावाला हा धक्का सहन झाला  नाही आणि लहान भावानेही प्राण सोडल्याची घटना निलंगा तालुक्यातील मौजे  मदनसुरी गावात घडली. या घटनेने भावाबद्दल असणारे प्रेम निःशब्द करून टाकते. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही भावाचे  काही तासाच्या फरकाने निधन  झाल्याने मदनसुरी गावासह  परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मदनसुरी येथील रहिवाशी असलेले  राघोबा  बळीराम सूर्यवंशी वय ८१ वर्षे व निवृत्ती धोंडीबा सूर्यवंशी वय ७८ वर्षे असे निधन झालेल्या दोन सख्ख्या चुलत भावांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,राघोबा सूर्यवंशी हे आजारी होते.  ते घरीच होते. दि.१४ रोजी रविवारी  सकाळी ०८ वाजेच्या सुमारास त्यांचे अल्पशा आजाराने  घरीच  निधन झाले.
त्यांच्या निधनाची माहिती सख्खा चुलत भाऊ निवृत्ती सूर्यवंशी यांनाही समजली  या घटनेचा धक्का सहन नाही झाल्याने निवृत्ती सूर्यवंशी यांनीही  दुपारी ०१ वाजता आपला प्राण सोडला.त्यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास अंतीमसंस्कर करण्यात आले.दोघांच्याही पश्चात मुले,मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..