कोराळी येथील सोमलींगेश्वर देवस्थान जमिनीवरील...

कोराळी येथील सोमलिंगेश्र्वर देवस्थान जमिनीवरील  अतिक्रमण हटविण्याची मागणी...

लिंगायत समाजाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व  प्रशासनाचे दुर्लक्ष 

-प्रा.सुदर्शन बिरादार

निलगा,दि१४( मिलिंद कांबळे)

मौजे कोराळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील सोमलिंगेश्वर देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी  लिंगायत समाज व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,कोराळी हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरिल गाव असून या गावात सोमलिंगेश्वर देवस्थानच्या नावे जमीन सर्वे नंबर १९२ मधील एकूण क्षेत्र ३९ .०६ व २३२/२ मध्ये एकूण क्षेत्र ०.१८ आर आसून मागील अनेक  वर्षांपूर्वीपासून देवस्थानच्या मालकी व कब्जेत आहेत.त्याची नोंद नमुना नंबर ०८ व जुन्या  सातबाऱ्या वरही आहे.

मात्र सदरील जमीन तत्कालीन  तलाठ्यांनी परस्पर इतरांच्या नावे करून दिली आहे. वरिष्ठाच्या आदेशाने असे केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
तत्कालीन  तलाठी यांना आदेश देणारे ते वरिष्ठ अधिकारी कोण याचा शोध ग्रामस्थ घेत आहेत.

सोमलिंगेश्वर मंदिराची जमीन  बळकावण्यात आली आहे. ती परत देवालयाच्या नावे करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांना  निवेदनाद्वारे केली आहे.

मात्र या विषयाकडे तहसीलदार,
जिल्हाधिकारी यांनी अनेक  दिवसापासून या विषयाला बगल दिली असून या प्रकरणाकडे लक्ष देण्यात आले नाही.  

त्या निषेधार्थ कोराळी येथील  ग्रामस्थांनी लिंगायत महासंघाचे नेते प्रा सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वात निलंगा येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अनेक विषयावर समस्या मांडण्यात आल्या.

यावेळी  कोराळी गावाबरोबरच देवी हल्लाळी या गावात महात्मा बसवेश्वराचे भाच्चे चन्न बसवेश्वर यांचे वास्तव्य लाभले होते त्याच्या खुणा तिथे गुहा व त्यांचे मंदिर आहे. या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

याबाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचप्रमाणे भंगार चिंचोली येथील बसवेश्वरांची लावलेली प्रतिमा काढून टाकण्यात आली आहे .ती प्रतिमा किंवा त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वराचा पुतळा बसवण्यात यावा तसेच निलंगा तालुक्यातील अनेक गावात लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. 
गाव तेथे स्मशानभूमी मिळावी अशी सरकारची भूमिका असतानाही लिंगायत समाजाला स्मशानभूमीपासून वंचित ठेवले जात आहे. त्याचप्रमाणे निलंगा शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र अद्याप  पुतळा  उभा केला गेला नाही. लिंगायत आरक्षण व महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या विषयावर ही प्राध्यापक सुदर्शन बिराजदार यांनी अनेक मागण्या मांडल्या  व या  प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सकारात्मक हालचाली पंधरा दिवसांत नाही झाल्यास लिंगायत महासंघाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी दिला.या पत्रकार परिषदेस लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष करीबसवेश्वर पाटील लिंगायत महासंघाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत डांगे सरचिटणीस अशोक कडादी, सरचिटणीस रामेश्वर तेली, समाजाचे मार्गदर्शक सूर्यकांत पत्रे,एन आर स्वामी, नागनाथ अप्पा नीला,परमेश्वर कटाळे, रामेश्वर चेटके, अजय पाटील, श्रीकांत अष्टुरे, चंद्रकांत दुधभाते,संजय लादे, अजय पाटील, लिंगायत महासंघाच्या महिला सरचिटणीस सौ वैशालीताई व्होनाळे, लिंगायत महासंघाच्या महिला अध्यक्ष सौ संगीता भुसनुरे, पंचायत समिती सदस्य गोकर्णाताई पाटील, यांच्यासह लिंगायत महासंघाचे अनेक पदाधिकारी व लिंगायत समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..