आमदार संभाजीरावांनी शेतकऱ्यांसोबत साजरा केला बैल प ोला
आ.संभाजीरावानी शेतकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा...
जनसन्मान यात्रा आनंद वाडी गौर येथे दाखल
निलंगा ,.दि.३
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. श्रावण अमावस्येला येणारा बैलपोळा कृषीप्रधान सण म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असतो. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पदयात्रेचा अकरावा दिवस दि,2 सप्टेंबर रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघाचा जवळ पास 270 किलोमीटरचा पायी प्रवास करून ही यात्रा उन्हाची पावसाची ऊन वाऱ्याची तमा न बाळगता जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन व गेल्या पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाची माहिती व लोकार्पण करीत निघालेली ही पदयात्रा काल बैलपोळा सणा निमित्त मौजे गौर येथे दाखल झाली,शेतकऱ्यां प्रती प्रेम, निष्ठा ,जिव्हाळा,भावनिक नाते जपलेल्या माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर याना येथील शेतकरी गावकऱ्यासोबत बैलपोळ्याचा सणामध्ये सहभागी होण्याचा योग लाभला स्वतः बैलांच्या मोरक्या पकडून मारुती मंदिरा भोवती त्यांना प्रदक्षिणाही घातली बैलांची पूजा केली आणि बैलपोळा ग्रामीण भागात कशा पद्धतीने साजरा होतो, हे प्रत्यक्षात बसून त्याचा अनुभव घेतला व गावातील मारुती मंदिराला फेऱ्या घालून गावकऱ्यांनी काढलेल्या बैलाच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली ,यावेळी भालकीचे माजी आमदार प्रकाश खड्रे भालकी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नेतेहोते त्याचबरोबर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, सभापती शिवकुमार चिंचनसुरे उपसभापती लालासाहेब देशमुख, संचालक गटनेते रोहित पाटील,पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैल पोळा सण साजरा करताना मला खूप आनंद होतोय बैलपोळा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण आहे. हा सण मी गौर आनंदवाडी या ठिकाणी साजरा करतोय याचा मला खूप आनंद होतोय, या सना निमित्त महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बैल पोळा सणानिमित्त शुभेच्छा दिल्या..
Comments
Post a Comment