निलंगा आगारात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा..
निलंगा आगारात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा..
निलंगा,दि.१७
दळणवळण व वाहतूक यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असून यात वाहतुक हा मुख्य कणा असलेल्या वाहन चालकांचे मोठे योगदान आहे. वाहन चालकाचा सन्मान व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता १७ सप्टेंबर चालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
यानिमित्त राज्य प. निलंगा बस स्थानकात विश्वचालक मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने रा.प.सुरक्षित सेवा चालकाचा सत्कार निलंगा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आगारातील रा.प.चालकांना वाहतुकीच्या नियमाचे तसेच सीटबेल्ट,मोबाईल आयोग्य वापर, आरोग्य, आहार,आराम, याबाबत प्रबोधन करून आपल्या व जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विश्वचालक ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक-अभिषेक भाऊसाहेब जाधव यांनी पूर्वी गुणवत्ता तसेच उच्चशिक्षित इंजिनियर डॉक्टर यांनाच बाहेर देशात संधी असायची सध्या आपल्या देशातील होतकरू सुशिक्षित प्रशिक्षित कुशल चालक युवक युवतींना जर्मनीत मागणी होत असून यापुढे भविष्यात इतर देशात चालकाच्या कमतरतेमुळे कुशल चालकांना संधी उपलब्ध होताना दिसतील याकरिता आपल्या भागातील होतकरू युवकांना परिपूर्ण प्रशिक्षणासह कुशल चालक घडविण्याचा संस्थेचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी निलंगा स्थानक प्रमुख श्री अभिमन्यू रासुरे तसेच आगारातील असंख्य चालकासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment