ई- पिक पाहणीचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी....

ई-पीक पाहणीचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी  कागदपत्र सादर  करावेत..

निलंगा,दि.१७

सन २०२३ साली ज्या शेतकऱ्यांनी  ई-पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे.व ज्यांचे यादीमध्ये  नाव आहेत  परंतु अद्याप अनेक शेतकऱ्यांनी  कागदपत्र सादर केले नाहीत. अश्या  शेतकऱ्यांनी तत्काळ  आवश्यक  कागदपत्र  सादर करावे व  शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन  कृषी सहाय्यक संतोष नन्नावरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
त्याचप्रमाणे ई.स. २०२३ साली सोयाबीन पिकासाठी ई- पीक पाहणी केलेल्या व शासनाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या परंतु  अद्याप कागदपत्र सादर न केलेले शेतकरी  अनुदानापासून वंचित राहू नये  त्याच प्रमाणे सामायिक खातेदार  शेतकऱ्यांनी १०० रुपयाच्या बाँड पेपर वर ना हरकतीचे  शपथपत्र  कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावे असे आवाहन ही त्यांनी  यावेळी केले.
यापूर्वी  सिंदखेड  पालापुर ,निलंगा येथील शेतकऱ्यांना नॅनो युरिया लिक्वीड, नॅनो डी ए पी लिक्वीड १७५ लिटरचा  पुरवठा व मेटालाईटचाही शासनाच्या उद्दिष्टा प्रमाणे पुरवठा  करण्यात आला आहे.
शासनाने  शेतकऱ्यांना  बॅटरी चलित फवारा पंप तत्काळ पुरवठा  करण्यात यावा अशी शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी  होत आहे. त्यासोबतच भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये शेतकऱ्याने  लाभ घ्यावा, पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी ई के वाय सी आधार सेडिंग करून घ्यावे व १८ व्या हप्त्याचा  लाभ घ्यावा,वैयक्तिक शेतकऱ्याने रब्बी पीक निघण्यापूर्वी शेत तळ्यासाठी  ऑनलाईन अर्ज  करून घ्यावे व लाभ घ्यावा. असेही  आवाहन नन्नावरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..