निलंगा काँग्रेस कमेटीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा..

निलंगा काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा

निलंगा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने स्व.प्रा.दयानंद चोपणे यांना श्रद्धांजली अर्पण..

निलंगा,दि.१७

निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निलंगा काँग्रेस कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै.शेषराव वाघमारे(आनंदमुनी) व जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर (माजी मुख्यमंत्री) यांच्या प्रतिमेस  पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.निलंगा मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील - निलंगेकर व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्याचप्रमाणे डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते,बहुआयामी नेतृत्व प्रा.दयानंद चोपणे यांचे निधन झाल्याने निलंगा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करत स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली...

यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,भारताला स्वातंत्र्य १९४७  ला मिळाले.परंतु मराठवाड्याला १९४८ ला मिळाले मराठवाडा विनाअट हैद्राबाद स्टेट मधून महाराष्ट्रात विलीन झाला.या लढयात स्वामी रामानंद तीर्थ,कै.शंकरराव चव्हाण,कै.शेषराव वाघमारे,कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर अशा अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांच्या सिंहाचा वाटा आहे.यामध्ये स्वातंत्र्य मिळवल्यापासून ते सामाजिक विकास कार्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे.हे विसरून चालणार नाही यासाठी सरकारने मराठवाड्याला अनुशेष भरून काढण्यासाठी भरगोस मदत करावी असे ते म्हणाले. 
यावेळी प्रदेश सचिव अभय साळुंके,डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद भातम्बरे,मा.सभापती अजित माने,मा.नगराध्यक्ष हमीद शेख,निलंगा अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल,मा.नगरसेवक अशोक शेटकार,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,उपाध्यक्ष वीरभद्र आग्रे,प्रशिक्षण सेल जिल्हाध्यक्ष चक्रधर शेळके,मा.सभापती महेश देशमुख,समद टेलर,रविशेट अग्रवाल,तुषार सोमवंशी,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम,ऍड.विक्रांत सुर्यवंशी,बबलू जाधव,सरचिटणीस रोहन सुरवसे,अनु.जा.शहराध्यक्ष गिरीश पात्रे,दीपक निलंगेकर,सोहेल शेख,किरण बेवनाळे,भागवत बिराजदार,मेनू मणियार,अरविंद कांबळे,नागनाथ घोलप,इ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..