मसलगा व हाडगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यावर....
मसलगा व हाडगा प्रकल्पाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची करण्याची मागणी....
निलंगा,दि.०९
तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्प व हाडगा लघु प्रकल्प या दोन्ही प्रकल्पावरील बेजबादार अधिकारी हे एकच आहेत.
त्यामध्ये मुख्य कार्यकारी, अमरसिंह पाटील व पवार यामधील सर्व बेजबाबदार अधिकारी यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी निलंगा यांना छावा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्पाला भेगा पडली असे निदर्शनास आणून दिल्यानंतर कुठल्याही चौकशीचे आदेश न देता अचानक रातोरात पाणी सोडलेल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी मलसलगा परिसरातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
मसलगा मध्यम प्रकल्पाला धोका नव्हता तर पाणी सोडले का ? व असे अचानकपणे पाणी सोडून शेतकऱ्यांच्या शेतातील मुग, उडीद व सोयाबिन, ऊस असे इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. व या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी पुढील उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न उध्दभवनाऱ्या अधिकाऱ्यांनी हा बेजबाबदारपणे वागुन मसलगा मध्यम प्रकल्पावरीत आधारीत जल सिंचन विहीत आठरा खेडे जल पेय योजना हा सर्व आजु-बाजूच्या शेतकऱ्यांचा शेतीचा व पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण केला आहे.
अशाच प्रकारे दोन महिन्यापुर्वी हाडगा लघु प्रकल्पाचे दुरूस्तीचे काम करून दोन महिने सुध्दा उलटले नाहीत. त्यातच अचानक दोन दिवसा पुर्वीच हाडगा लघु प्रकल्पाचे पाळु खचुन पुर्णतः पाळू फुटला आहे. व शासनाने लाखो रूपयचा निधी खर्च करूनही पाणी सर्व वाहुन गेले आहे. त्यामुळे भविष्यात हाडगा लघु प्रकल्पाच्या पाण्यावरती असणारे गावे हाडगा, उमरगा वडगाव, सिंदीजवळगा, ह्या सर्व गावांना अशा बेजबाबदार अधिकऱ्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या दोन्ही गावातील अधिकाऱ्यांमुळे तलावामध्ये हालगर्जीपणा करण्याऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती चौकशी करून सर्व बेजाबदार अधिकाऱ्यांना पदावरून कमी करण्यात यावे. अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर छावा संघटनेच्या वतीने व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पुढील आठ दिवसात उपोषणास बसणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी टिपू सुलतान संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनिल सूर्यवंशी यांनी पाठिंबा दिला आहे.
Comments
Post a Comment