काटेजवळगा येथील महिलेची मांजरा नदीपात्रात स्वहत्या...

काटेजवळगा  येथील  महिलेची धनेगाव येथील  मांजरा नदीपात्रात उडी मारून स्वहत्या...


मुलगी मेल्याच्या होती दुःखात...

 निलंगा , दि.१३

 मुलगी मेल्याच्या दुःखात असलेल्या एका महिलेचा मांजरा नदीपात्रात उडी मारून स्वहत्या केल्याची घटना घडली आहे. राजश्री सोमनाथ निला वय ६५ वर्ष रा. काटेजवळगा ता. निलंगा असे स्वहत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथील मयत महिलेची एकुलती एक असलेल्या मुलीचा गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे ते गेल्या दोन-तीन वर्षांपासून निराश होती. दि. १३ सप्टेंबर रोजी येथील धनेगाव बॅरेजच्या खालच्या बाजूला मांजरा नदीपात्रात एका महिला मयत अवस्थेत नदीपात्रात तरंगत असल्याचे गावकऱ्यांना दिसली सदरील मयत महिलेची ओळख पटल्याने मयत महिलेच्या नातेवाईकांनी प्रेत निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. सदरील घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीसांनी घटनास्थळीचा पंचनामा करून निलंगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास निलंगा पोलीस करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..