मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन...

मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. 

निलंगा,दि.२४

मराठा सेवा संघ निलंगा तालुका शाखेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तत्पूर्वी  जिजाऊ, शिवराय यांच्या प्रतिमांचे महिलांच्या हस्ते  पूजन तर  ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी आमर पाटील यांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
   यावेळी विद्यार्थी आणि मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ सहकारी त्याचबरोबर विविध क्षेत्रात व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. 
    वर्धापन दिनानिमित्त यावेळी शंभूराजे यांचे जीवन चरित्र व तुकोबा वाणीचे अंक असे अडीचशे ग्रंथ  भेट देण्यात आले. जिजाऊ सृष्टी निलंगा येथे आयोजित मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी जाधव महासचिव जतूसाप महाराष्ट्र हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जाधव एम एम, सतीश हानेगावे राज्य प्रवक्ता जतूसाप अनंतराव गायकवाड, गोविंद इंगळे , अरुण सोळंके हे उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध विषयावरती चर्चासत्र व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
  यावेळी अरुण सोळंके यांनी शिक्षणातील गुणवत्ता यावर आपली मते मांडली व प्रत्येक क्षेत्रामध्ये गुणवत्ता ढासाळलेली आहे याविषयी खंत व्यक्त करून गुणवत्ते शिवाय पर्याय नाही याची मांडणी केली.
      गोविंद इंगळे यांनी उद्योग क्षेत्रातील नवतरुणांना रोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व मनाची तयारी असेल व सकारात्मक विचार असतील तर उद्योग व्यापार यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो अभ्यास केला पाहिजे तर अशक्य असे काही नाही असे सुचवले. अनेक उद्योगाच्या संधी त्यांनी उलगडून दाखवल्या. 
    सतीश हाणेगावे यांनी धर्म व कर्मकांड याची अतिशय सखोलपणे चीरफाड केली. कोणताच धर्म वाईट नसतो धर्माच्या नावावर लोकांना लुबाडणारे समाजात भांडण लावणारी ढोंगी पाखंडी यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.
   जाधव एम एम यांनी मराठा सेवा संघ काल आज आणि उद्या याबाबतीत खेडेकर पुरुषोत्तम यांनी त्या कालावधीत कर्मचारी शेतकरी कष्टकरी बेरोजगारी आत्महत्या व व्यसनाधीनता हे समाजातील वाईट चित्र पाहून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी मराठा सेवा संघाची  1सप्टेंबर1990रोजी स्थापना केली व आहेरे वर्गाने नाहिरे वर्गासाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीव संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली. व आज त्याचे चांगले परिणाम समाजात पाहिला मिळत आहेत उद्याचा समाज घडवायचा असेल तर स्त्रियानाही बरोबरीचे स्थान दिले पाहिजे यासाठी भविष्यात काम करावे लागेल तरच समाज राष्ट्र मजबूत होईल असा विचार मांडला.
   बालाजीराव जाधव यांनी अध्यक्षिय समारोप करताना मराठा सेवा संघाच्या 32 कक्षातील जतुसापची भूमिका विशद केली व समाजाला अंधश्रद्धा, व्यसन, व दारिद्र्यातून बाहेर काढायचे तर शिक्षण महत्वाचे आहे असा संदेश दिला.
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेलवाडे आर के यांनी केले तर सूत्रसंचालन अमरदिप पाटील यांनी केले आभार अजय मोरे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजिनिअर मोहन घोरपडे , बरमदे डी बी, आनंद जाधव,प्रताप हंगरगे ,संदीप  खमितकर ,अनिल जाधव, ज्ञानेश्वर जाधव,बाळासाहेब बिरादार, पवार अमित, रंजना जाधव, शिंदे आर जी, प्रियंका पाटील यांनी परिश्रम घेतले..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..