माथेरान मॅरेथॉन मध्ये निलंगा ग्रुपची उत्तम कामगिरी...
माथेरान मॅरेथॉन मध्ये निलंगा मॅरेथॉन ग्रुपची उत्कृष्ट कामगिरी...
निलंगा,दि.२५
दिनांक २२ सप्टेंबर वार रविवार रोजी माथेरान येथे महाराष्ट्रातील अतिशय खडतर मार्ग असलेल्या माथेरानच्या वन विभागाच्या ट्रेल रोडवर ५ कि.मी, १० कि.मी, १२.५ कि.मी व २५ कि.मी अशा विविध कॅटेगरी असलेल्या मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.
हा मार्ग संपूर्ण दगड गोटे, निसरडा रस्ता व तीव्र चढ उतार असल्याने या मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांचा चांगलाच कस लागतो, म्हणूनच या मॅरेथॉनला एन्डयुरेथॉन असे म्हंटले जाते.
या खडतर मॅरेथॉनमध्ये निलंगा मॅरेथॉन ग्रुप च्या ५ सदस्यांनी भाग घेतला होता. यात १० कि.मी कॅटेगरी मध्ये हरिविजय सातपुते व डॉ.सचिन जाधव यांनी सहभाग घेतला होता तसेच १२.५ कि.मी मध्ये डॉ. सचिन बसुदे व डॉ. नितीश लंबे यांनी सहभाग घेतला होता तर २५ कि.मी कॅटेगरी मध्ये गणेश एखंडे यांनी सहभाग घेतला होता. सर्व रनर्स नी विक्रमी वेळात मॅरेथॉन पूर्ण करून मेडल्स पटकावले. त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे...
Comments
Post a Comment