तेरणा नदिपात्रासह परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्याखाली...

तेरणा  नदीपात्र  परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्यात... 

निलंगा,दि.२५ 

निलंगा तालुक्यातील अनेक गावात  तेरणा नदी वाहत असलेल्या नदिपात्रा  शेजारील  कोकळगाव, सांगवी, नदीहत्तरगा कामले वाडी, रामतीर्थ, मदनसुरी, लिंबाळा, दादगी,चिंचोली भंगार, येळणूर,सोनखेड, मानेजवळगा, सावरी आदी  शिवारात  पावसाने मंगळवारी दुपारनंतर थैमान घातले होते.मुसळधार पावसाने तालुक्यात विविध ठिकाणी हजेरी लावली.
            मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील तेरणा नदीपात्र परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजांच्या कडकडा- टासह तुफान मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेे. 
    मदनसुरी महसूल मंडळात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला गेला आहे.
    यामुळे शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महसूल मंडळात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे सोयाबीनचे व इतर पीक पाण्यात गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
    प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
जवळपास अडीच तास मुसळधार पाऊस झाला.या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे  नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडे विमा भरूनही विमा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..