निलंगा तालुक्यात घरगुती गॅसचा हॉटेल व्यवसाया साठी वापर,....
निलंगा तालुक्यात घरगुती गॅसचा हॉटेल व्यवसायासाठी वापर...
निलंगा,दि.२५
निलंगा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही आता घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात हॉटेल, बेकरी,खाणावळ आदी छोट्या मोठ्या.व्यवसायासाठी अवैद्यरित्या सर्रास वापर चालू असून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक हॉटेल चालक घरगुती गॅस सिलिंडरचा खुलेआम वापर करीत असल्याने महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
निलंगा तालुक्यात गॅस सिलिंडरची परिस्थिती मागणी कमी आणि उपलब्धता जास्त झाला आहे काय ? अशीच परिस्थिती निलंगा शहरासह तालुक्यातील
मदनसुरी, कोकळगाव, निटुर,आंबुलगा (बु), कासार बालकुंदा,उस्तुरी, बडूर, केळगाव, औराद (शहा) इत्यादी गावासह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी झाला आहे ..
घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असून, ८२९ रुपयांचे सिलिंडर काळ्या बाजारात तब्बल एक हजार रुपये पेक्षा ज्यास्त दराने विकले जात आहे. वास्तविक महसूल विभागाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना देखील अनेक हॉटेल व्यावसायिक खुलेआम घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत.
असे असताना देखील महसूल विभागाच्या एकाही अधिकारी वा कर्मचाऱ्याला ही बाब निदर्शनास येत नाही काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
हॉटेल व्यावसायिकां- बरोबरच घरगुती गॅस सिलिंडरचा उपयोग अनेक चारचाकी गाड्यांमध्ये करण्यात येत असून सिलिंडरमधून गाडीत गॅस भरून देणारे मोठे रॅकेट निलंगा शहरासह तालुका परिसरात कार्यरत आहे काय ?
गॅस सिलिंडरच्या या काळ्या धंद्यामुळे तालुक्यातील गॅस ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिलिंडर बुकिंगपासून तर ताब्यात मिळेपर्यंत संबंधित एजन्सी धारकांकडे अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत. तालुकाभरातून येणाऱ्या ग्राहकांचे प्रचंड हाल होत असून, लांबच्या अंतरावरून येणाऱ्या ग्राहकाला एका सिलिंडरसाठी किमान १०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, गॅस सिलिंडरच्या काळ्या धंद्यात एक सिलिंडर हजार रुपयापेक्षा अधिक दराने अगदी सहजरित्या उपलब्ध होत आहे. शहर व तालुक्यात हॉटेल व्यावसायिक व गॅसवर चालणाऱ्या चारचाकी यामुळेच तालुक्यात गॅसची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे...
याबाबत पुरवठा विभाग काय ॲक्शन घेणार...?
हा प्रश्न सद्यातरी निरुत्तरितच आहे..
Comments
Post a Comment