महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता दिन साजरा...
महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात जागतिक औषध निर्माता दिन साजरा..
निलंगा,दि.२६
महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक औषध निर्माता दिन 25 सप्टेंबर 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील - निलंगेकर साहेब व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन निलंगा चे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व शहरातील सर्व औषधे विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. रॅली ची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर व औषध निर्माते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले .
सदरील रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यां तर्फे फलकाद्वारे विविध आजार व त्यावरील उपचारा संदर्भात प्रबोधन करण्यात आले. त्यादरम्यान विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बस स्थानक ,निलंगा येथे उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविले व परत महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली .तसेच विद्यार्थ्यांसाठी अल्पपहाराचे आयोजन एन. एस .एस युनिट तर्फे करण्यात आले. कार्यक्रमास डॉक्टर गरड सुनील यांनी सर्वांना फार्मासिस्ट शपथ दिली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील प्राचार्य डॉक्टर बी एन पोळ , सर्व डी व बी फार्मसी चे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एच. एस . समन्वयक परवेज शेख व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment