महिलेस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
निलंगा, दि.१२(मिलिंद कांबळे)
तालुक्यातील मिरगणहळळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेल्या सरलाबाई विठ्ठल सूर्यवंशी यांना गावातीलच शाहूराज विश्वंभर सूर्यवंशी यांनी मारहाण केल्याप्रकरणी कासारसिरसी पोलिस ठाण्यात दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ रोजी गु.र.न ०३१७/२०२४ नुसार भारतीय न्याय संहीताचे कलम (बी एन एस ) २०२३/ ११५(२),भारतीय न्याय संहीता कलम (बी एन एस ) २०२३, ३५२,भारतीय न्याय संहीता कलम (बी एन एस ) २०२३ ,३५१(२),भारतीय न्याय संहीता कलम (बी एन एस ) २०२३, ३५१(३)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करीत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की फिर्यादी महिला दि.०८ सप्टेंबर२०२४ रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास घरासमोर थांबल्या असता त्यांच्या भावकीतीलच शाहुराज विश्वंभर सूर्यवंशी हा ट्रॅक्टर मध्ये बांधकामासाठी धोंडे घेऊन येत होता. त्यावेळेस तू दिवसभर पाण्याचा पाईप लावून का ठेवलीस म्हणून अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला त्यावेळी असे शिवीगाळ करू नको म्हणाले असता लाथाबुक्क्यांनी लाकडी काठीने हाताच्या डाव्या हातावर,उजव्या कोपरावर मारहाण करू लागला. तूला लय माज आला आहे तुझा माज जिरवून टाकतो म्हणून तुला खलास करून टाकतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.यामुळे महिला व त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहे.
Comments
Post a Comment