दयानंद (अण्णा)चोपणे यांना साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप...

दयानंद (अण्णा) चोपणे यांना साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप..

निलंगा,दि.१६ (मिलिंद कांबळे)

फुले ,शाहू,आंबेडकरांचे  विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे  पोहचविण्यासह वंचितांसाठी लढा देणारा लढवय्या आणि चळवळीचा भाष्यकार दयानंद (अण्णा)  व्यंकटराव चोपणे यांचे दि.१५ रोजी सायंकाळी ०५  वाजता लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान वयाच्या ६३ व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी येथील शांतीवन  स्मशानभूमीत दुपारी ०१ एक वाजता अनेक मान्यवरांच्या नातेवाईकांच्या ,त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत  अंतिमसंस्कार  करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली. यावेळी माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख,अशोकराव पाटील - निलंगेकर,अभय (दादा) साळुंके,विलास सूर्यवंशी,मोहन क्षिरसागर,रजनीकांत कांबळे,पंडित धुमाळ,अजित माने ,नारायण सोमवंशी, गोविंद इंगळे, डॉ.नरसिंग भिकाने ,अंकुश ढेरे , हमीद शेख,भारत काळे,शरद पेठकर, विजयकुमार पाटील, सौ.मंजुषा निंबाळकर, अजित निंबाळकर,अविनाश रेषमे,विरभद्र स्वामी ,मुरलीधर कांबळे,यांनी उपस्थित राहून शोक व्यक्त केला.तर प्रा.रोहित बनसोडे,प्रा.अभिमन्यू पाखरसांगवे  यांनी श्रद्धांजली सभेचे  नियोजन केले होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..