निलंगा आणि देवणीच्या अर्धवट बस स्थानकाचे उद्घाटन कायद्याने योग्य आहे का ?..
निलंगा आणि देवणीच्या अर्धवट बस स्थानकाचं उद्घाटन कायद्याने योग्य आहे का ?
आमदार संभाजी पाटील - निलंगेकर यांना अभय साळुंके यांचा सवाल.
निलंगा,११
मागील सहा वर्षांपासून निलंगा व देवणी या नवीन बस स्थानकाचे कामकाज सुरू असून ते बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तरीही स्थानिक आमदार संभाजी पाटील - निलंगेकर यांनी या अर्धवट बांधकामाचं उद्घाटन करून जनतेसमोर सादर केलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत एस टी महामंडळ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करून अपूर्ण बस स्थानकाचे उद्घाटन करणे हे कितपत कायदेशीर आहे.असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे स्वतः काँग्रेस नेते अभय साळुंके यांनी निलंगा येथील अर्धवट काम झालेल्या बस स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.या बाबतचा त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Comments
Post a Comment