येळणूरच्या तेरणा नदीवरील पुलाचे कठडे तुटले...
येळणूरच्या तेरणा नदीवरील पुलाचे कठडे तुटले...
निलंगा,दि.०९
मौजे येळणूर ता.निलंगा जिल्हा लातूर येथील तेरणा नदीपात्रावरील रस्त्याच्या पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशी वर्गात नाराजी आहे.
निलंगा ते येळणूर या गावचे १७ किलोमीटर अंतर असणारा असून हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर येळणूर येथील तेरणा नदीवरील पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे काही वर्षांपासून चोरीस गेलेले आहेत. शासनाकडून नवीन कठडे बसवण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. हा रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यावर ग्रामीण भागातील काही गावात एसटी बस ही ये-जा करत असतात. तसेच, या रस्त्यावरून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी निलंगा येथे दररोज एसटी बसने ये - जा करीत असतात प्रवास करतात. हा रस्ता प्रवासासाठी संरक्षक कठडे नसल्यामुळे धोकादायक बनला आहे. या पुलाखालून पाणी वाहत असताना कठडे नसल्यामुळे मोटारसायकल, जीप अशी वाहने वाहून गेली आहेत. त्यामुळे या पुलाचे संरक्षक कठडे बसविण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे...
Comments
Post a Comment