विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त...
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त...
निलंगा,दि.०७
ऐन पावसाळ्यात निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील विजेचा लपंडाव सुरू झाला तरी सुरूच आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, काही ठिकाणी महावितरण केबलला आग लागण्याचेही प्रकार घडत आहेत.
कोकळगाव येथील महावितरणच्या भारनियमनाचे संकट नसले, तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. मागील काही महिन्यांपासून कोकळगाव परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्री अपरात्री बत्ती गुल होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. दिवसांतून किमान चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असून महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वीज पुरवठा खंडित झाला की तब्बल चार ते पाच तासांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागते. महावितरणकडून वेळी अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा परिणाम नागरिकांच्या कामकाजावर होत आहे. ग्रामीण भागात अनेक छोटे-मोठे उद्योग चालत आहेत. तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित संगणकीय खासगी तसेच व्यावसायिक कामे घरोघरी चालत आहेत. अशावेळी विजेचा लपंडाव होत असल्याने संगणक व इतर वस्तूमध्ये तांत्रिक बिघाडाच्या शक्यता वर्तवली जात आहे. त्यात पावसाळयात विजेच्या खेळीचा फटका घरगुती विद्युत उपकरणांना देखील बसत आहे.महावितरणचे
ज्या ठिकाणी तांत्रिक बिघाड आहे त्याठिकाणी दुरुस्ती केली की काही मिनिटांतच स्पार्क होऊन पुन्हा बत्ती गुल होते आणि हा प्रकार सातत्याने होत आहे. सततच्या बत्तीगुल मुळे नागरिकांचा चार्जिंग बल्ब खरेदीवर जोर वाढला आहे.त्यामुळे अनेकांच्या घरात इन्व्हर्टर ची भर पडली आहे.वीज नाही म्हणून पाणी नाही..
घरोघरी होणारा पाणी पुरावढा हा विजेवर अवलंबून असल्याने वीज असेल तरच पाणी असते. पाणी येण्याची वेळ झाली की नेमकी बत्तीगुल होते. ह्याचा फटका महिलांच्या दैनंदिन कामकाजावर होऊ लागला आहे.
वीज व पाणी देता का अशी साद महावितरण प्रशासनाला घालावी लागते. रोज वीज जाण्याचे प्रकार घडत असल्याने त्याचा परिणाम आमच्या दैनंदिन कामकाजावर होऊ लागला आहे. नाहक त्रास आम्हाला सोसवा लागत आहे. यामुळें विजेच्या बत्ती गुलकडे स्थानिक आमदार आणि खासदार लक्ष वेधून सुव्यवस्थित वीजपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment