महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात नवरात्र उत्सव साजरा..
महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात नवरात्र उत्सव साजरा..
निलंगा,दि.११
महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा तर्फे नवरात्र उत्सवाचे आयोजन विविध पद्धतीने करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व तुळजाभवानी अन्न छत्र मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी तुळजापूर येथे पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी प्रथमोपचार औषधी वाटप शिबिर तथा महाविद्यालयातील विधार्थ्यासाठी गरबा नृत्याचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुळजापूरला नवरात्र महोत्सवामध्ये पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे मोफत औषधाचे वाटप व तपासणी शिबीर आयोजित केले होते. तसेच महाविद्यालयातील विधार्थ्यासाठी संध्याकाळी गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. रंगबिरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून विधार्थ्यानी संगीताच्या तालावर तालबद्ध गरबा व दांडिया नृत्य सादर केले. या सार्वजनिक उपक्रमासाठी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, प्राचार्य डॉ. भागवत पौळ राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.सुनील गरड, प्रा. परवेज शेख, प्रा. रविराज मोरे, डॉ. शरद उसनाळे, डॉ. माधव शेटकार, डॉ. संतोष कुंभार, डॉ. चंद्रवदन पांचाळ, प्रा. नंदा भालके, प्रा. शिवराज हूणसनाळकर, प्रा. सुजित पवार, प्रा. सुरज वाकोडे, प्रा. विनोद उसनाळे, प्रा. मयुरी गुडले, प्रा. सानुली पोळकर, प्रा. इर्शाद शेख, प्रा. प्रीती माकने, ग्रंथपाल श्री व्यंकट गार्डी, प्रा. अविनाश मुळदकर, डॉ. संजय दुधमाल, डॉ चंद्रकांत ठाकरे, श्री विलास कारभारी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व डी फार्मसी, बी.फार्मसी आणि एम. फार्मसी चे विद्यार्थी हजर होते. अन्नदान व औषधी वाटपाचे आयोजन प्रा. रविराज मोरे व तुळजाभवानी अन्न छत्र मंडळ यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झाले.
Comments
Post a Comment