नणंद येथील टाकेकर वस्तीला जाणारा...

नणंद येथील टाकेकर वस्तीला जाणारा पुल बनवण्याची मागणी...

निलंगा,दि.०५ 
मौजे नणंद  तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील नणंद गावालगत  पन्नास कुटुंबाची टाकेकर वस्ती असलेल्या वस्तीला जाणारा पुल तात्काळ  बनवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रा.अण्णासाहेब मिरगाळे  यांनी गटविकास अधिकारी निलंगा यांना  दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की  पावसाळ्याच्या काळात जास्त पाऊस झाला की टाकेकर वस्तीला जाणाऱ्या  रस्त्यातील ओढ्यावरून पाणी जात असल्यामुळे शाळकरी मुलांना चार दिवस झाले शाळेला जाता येत नाही. यासंदर्भात युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी गटविकास अधिकारी सोपान अकेले  यांना भ्रमणध्वनीद्वारे  संपर्क केला असता त्यांनी तात्काळ अभियंता  पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. मागील अनेक वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यावर प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही, तरी प्रशासनाने तात्काळ स्थळ पाहनी करून ओढ्यावरील पुल तत्काळ बांधून देण्यात यावा. अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख  प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.
निवेदनावर   बस्वराज पाटील, बालाजी नारायणपुरे, राम लादे, दत्ता पाटील, उद्धव जाधव, अभय मिरगाळे आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत...

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..