फसव्या आमदाराच्या विरोधात...

फसव्या आमदाराच्या विरोधात राम कांबळे यांचे उपोषण...

काँग्रेस पक्षाचा पाठिंबा

निलंगा,दि.११

फसव्या आमदाराच्या आश्वासनांविरोधात मातंग समाजाचे नेते राम कांबळे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. प्रदेश सचिव अभय दादा साळुंके, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, आणि शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांनी उपोषण स्थळी जाऊन राम कांबळे यांची भेट घेतली व त्यांना आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.
निलंगाचे आमदार यांनी 2014 साली केंद्रीय शाळा आनंदमुनी चौक येथे पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते वारंवार ठिकाण बदलत राहिले, जसे की टाऊन हॉल, मातंग स्मशानभूमी इत्यादी. गत १५ ऑगस्ट २०२४ रोजी चौथ्यांदा नगरपालिकेच्या आवारात पुतळा उभारण्याचे उद्घाटन करण्यात आले आणि पंधरा दिवसांत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात येईल असे खोटे आश्वासन दिले. या प्रकारामुळे समाजाची फसवणूक झाली आहे.
या विरोधात लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष राम कांबळे यांनी उपोषणाला बसून आमदारांच्या खोट्या आश्वासनांचा निषेध केला. काँग्रेस पक्षाने यावेळी कांबळे यांना पाठिंबा देत, समाजाच्या हक्कांसाठी लढाई पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..