बालाजी सोमवंशी यांचा संशयास्पद मृत्यू....
बालाजी सोमवंशी यांचा संशयास्पद मृत्यू...
चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मुलाची मागणी...
निलंगा,दि.१२
मौजे सावनगिरा तालुका निलंगा येथील रहिवासी असलेले बालाजी शिवराम सोमवंशी वय ६० वर्षे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असल्यामुळे आरोपीचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताचा मुलगा सौरभ बालाजी सोमवंशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे..
दिलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, १४ डिसेंबर २०२३ रोजी बनाज कंपनीमधुन सेवानिवृत्त होऊन मागील काही महिन्यांपासून मूळ गावी सावनगिरा येथे राहण्यास एकटेच आले होते. मात्र दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी माझे वडील बालाजी सोमवंशी हे स्वतःच्या शेतलगत रस्त्याच्या नवीन पुलाखाली सकाळी ११:३० साडेअकरा वाजेच्या सुमारास मयत अवस्थेत आढळून आलेले आहेत. त्यांचे तोंड व पाय पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसून आले. सदरची माहिती मला माझ्या नातेवाईकांनी दिली. सदरची माहिती सावनगिरा येथील पोलीस पाटील यांच्या मार्फत निलंगा पोलीस स्टेशनला देण्यात आली. माझ्या मयत वडिलांचे फोटो व व्हिडीयो करून त्यांना इतर लोकांच्या सहाय्याने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे घेवून यावे असे सावनगिरा येथील बीट (जमादार) पटेल यांनी सांगितले. त्यानुसार त्यांना उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे दाखल केले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केले. दरम्यान त्यांच्या शरीरावर कोठेच थोडासाही खरचटलेली जखम दिसत नव्हती फक्त डोक्याच्या वरील भागात जबर मार लागलेला दिसून आला. शरीराची पूर्ण पाहणी केली असता शरीरावर कोठेच मार असलेले दिसले नाही. माझे वडील सावनगीरा या ठिकाणी एकटेच राहत होते. त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेवुन अज्ञात व्यक्तीने वडिलांचा घात-पात केल्याचा संशय आहे. याकरिता माझ्या वडिलांचा 9922249499 या मो नंबर वर शेवटचा कॉल किती वाजता झाला व कोणाशी झाला व मागील एक महिन्याची इनकमिंग व आउटगोइंग कॉल ची ऑडिओ द्वारे तपासणी करून घटनेची योग्य ती चौकशी करून न्याय द्यावा अशी ही विनंती करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment