आमदार साहेब अण्णाभाऊंचा पुतळा बसवा हो...
आमदार साहेब अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवा हो..!
निलंगा येथील मातंग तरुणाची आमरण उपोषणातून आमदारांना आर्त हाक...
निलंगा,दि.११
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा निलंगा शहरात पूर्णाकृती पुतळा उभा करण्याच्या मागणीसाठी येथील क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे निलंगा तालुका अध्यक्ष रामभाऊ कांबळे यांनी निलंगा येथील स्थानिक आमदार संभाजी पाटील - निलंगेकर यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा यांच्या यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसून आमदार साहेब पुतळा बसवा हो अशी आर्त हाक दिली असून असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील अनेक वर्षापासून निलंगा शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आले.मोर्चे ,उपोषणेही करण्यात आले. मात्र या मागणी संदर्भात अद्याप कसलाही विचार करण्यात आलेला नाही.स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्षच केले आहेत.त्यांनी अनेकवेळा अनेक ठिकाणी पुतळयासाठी जागेचे भुमीपुजन केले होते. मात्र आजपर्यंत पुतळा बसविण्यात आलेला नाही. या बद्दल मातंग समाज पुर्णतः संघार्षाच्या तयारीत आहे.मातंग समाजाच्या मागण्याची त्वरीत दखल घेवून नगर परिषद निलंगा येथील गार्डनमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा तत्काळ उभा करण्याचे काम चालु करण्यात यावे.अन्यथा याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रामभाऊ कांबळे तालुका अध्यक्ष क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना, निलंगा यांनी दिला आहे.या उपोषणास विविध पक्ष ,संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे..
Comments
Post a Comment