भीम आर्मीचे अतुल सोनकांबळे (रावण) यांचा वाढदिवस उत्साहात साजरी..

भीम आर्मीचे अतुल सोनकांबळे (रावण) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...

निलंगा,दि.१४

भीम आर्मीचे  संस्थापक तथा आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड खासदार चंद्रशेखर आझाद (भाई) यांनी समाजहितासाठी सुरू ठेवलेला सामाजिक लढा  पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या,कार्याचा, विचारांचा वारसा व आदर्श डोळ्यासमोर ठेवून  तो निलंगा तालुक्यात रुजविण्यासाठी प्रयत्नशील असलेला एक उमदा तरुण तथा भीम आर्मीचे निलंगा तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे (रावण) यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
   निलंगा शहरासह तालुक्यातील अनेक गावं खेड्यात त्यांच्या अनेक  हितचिंतक कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस फटाके फोडून रंजल्या-गांजल्या लोकांना ब्लँकेट व इतर उपयुक्त साहित्य वाटप करून  साजरा करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य  चौक असलेल्या चौकात आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
   यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राज लोखंडे  तालुका संघटक अनिल सुरवसे,तालुका कार्याध्यक्ष किशोर सुरवसे, शहर अध्यक्ष मनोज कांबळे,तालुका सचिव,अनिल कांबळे,तालुका सहसचिव पवन गायकवाड ,औराद सर्कल प्रमुख दिगंबर सूर्यवंशी,औराद सर्कल उपाध्यक्ष प्रथमेश सूर्यवंशी, गोविंद शिंदे ,राम मदने 
 संतोषआप्पा तूगावे, गहिनीनाथ शिंदे, धुळाप्पा तरंगे,रमेश पटसाळगे, 
 अर्जुन कांबळे,बबलू धुमाळ ,अनुप टोंपे,अंबादास डांगे,अभी पाटील ,जगन्नाथ शिंदे  दत्ता शिंदे,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..