खरी कमाई उपक्रमाने जि.प.प्रशाला अंबुलगा(बु)येथे गणित दिवस साजरा...

खरी कमाई उपक्रमाने जि.प.प्रशाला अंबुलगा बु येथे गणित दिवस साजरा 
  
अंबुलगा बु. दि. 27 डिसेंबर 2024

  थोर गणितज्ञ रामानुज यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा बु. ता. निलंगा येथे विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना प्रत्यक्षात व्यवहारातून कळावा, नफा-तोटा, खरेदी- विक्री, व्यवहार ज्ञान कळावे यासाठी खरी कमाई हा उपक्रम घेण्यात आला. 
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. बाळासाहेब बिरादार, उपाध्यक्ष यशोधन कांबळे, सरपंच स्वाती शिंदे, स्वस्त धान्य दुकानदार किरण शिंदे, उपसरपंच जगदीश सगर, ग्रामपंचायत सदस्य महावीर काकडे, इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक सुर्यवंशी सर, प्रशालेचे मुख्याध्यापक शिवशंकर मिरगाळे ब.शि.महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबळे, मा. शि. संघाचे जिल्हाउपाध्यक्ष तुबाकले सर, कुलकर्णी सर, गिरी सर, पाटील सर, सिध्दार्थ सोमवंशी सर, संदिप पाटील, अरविंद भालके, नागटिळक सर, भोसले मॅडम, पटने मॅडम, शेळकीकर मॅडम, स्वाती शिंगे आदी उपस्थित होते. 
विद्यार्थ्यांनी यासाठी विविध खाद्यपदार्थ बनवून आणले होते. खाद्य पदार्थ, फळे, पाणीपुरी आदी अनेक मेनू आणले होते विक्रीसाठी एकूण 30 स्टाॅल लावण्यात आले होते. यातून अंदाजे 15000 रुपयांची खरेदी विक्री उलाढाल झाली. खरेदीसाठी गावातील नागरिक, शाळेतील शिक्षक, इंदिरा विद्यालयाचे विद्यार्थी व प्रशालेतील विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..