धो - धो पावसाने लातूरला झोडपले
धो धो पावसाने लातूरला झोडपले : सखल भाग तलाव तर रस्त्याला नद्याचे स्वरूप
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दुपारी अडीच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला, या पावसामुळे भाजीपाला फळ विक्रेते,आणि छोटया व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली, शहरातील सखल भागात पाणी साचल्याचे तर रस्त्याना नद्याचे रूप आल्याचे दिसून आले. मागील पंधरा दिवसांपासून सलग सुरू असलेल्या अवकाळी या पावसाने हातावर पोट असलेले कामगार आणि शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.
संपूर्ण राज्यात सध्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक शहर आणि ग्रामीण भागामध्ये पूर सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे. लातूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याने जलजीवन विस्कळित झाले आहे. लातूर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून दररोज पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतीतील मशागतीचे कामे ठप्प झाली, तर हातावर पोट असलेली मजूर, छोटे व्यापारी, भाजीपाला आणि फळ विक्रेते यांची मोठी परवड झाली आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजताच धुवाधर पाऊस सुरू झाला, त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदी पात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment