प्रहारने ठोकले लातूरच्या एम.आय. डी.सी कार्यालयास टाळे...
- Get link
- X
- Other Apps
प्रहारने ठोकले लातूरच्या एमआयडीसी कार्यालयास टाळे..
लातूर,दि.२८(मिलिंद कांबळे)
एमआयडीसी भागात सुरू असलेले अनधिकृत क्लासेस बंद करून सदरील भूखंडधारकांवर कारवाई करावी यासाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौघुले यांच्या नेतृत्वात सोमवारी लातुरातील प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.
शहरालगत असलेल्या हरंगुळ परिसरात एमआयडीसीमध्ये रेल्वे स्टेशन लगत हार्मोनी एज्युकेशन अकॅडमी संचालकाने एमआयडीसी कार्यालयाची परवानगी न घेता सदर ठिकाणी क्लासेस सुरू केले आहेत. क्लासेसला ये जा करण्यासाठी काही विद्यार्थी रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जातात, या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने वारंवार मागणी करण्यात आली, त्यानंतरही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे टाळे ठोको आंदोलन करण्यात आले, येत्या तीन दिवसात अनाधिकृत चालणारे क्लासेस बंद करून क्लासेस चालक व भूखंड धारकावर कार्यवाही केल्यास प्रादेशिक अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर दिंड काढण्याचा इशारा जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी दिला त्यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी जाधव, चाकूर तालुकाप्रमुख वर्धमान कांबळे, शिरूर अनंतपाळ तालुकाप्रमुख युवराज मोहिते, देवणी तालुकाप्रमुख अंतेश्वर सूर्यवंशी, औसा तालुकाप्रमुख दत्ताभाऊ आनंदगावकर, जळकोट तालुकाप्रमुख संग्राम गायकवाड, सोहेल चाऊस, पांडुरंग सालमे, महिला आघाडी पदाधिकारी थोरवे, माळी, किशोर पोलाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment