तीर्रट खेळणाऱ्या नऊ जुगाऱ्यावर कारवाई..
तिर्रट खेळणाऱ्या 9 जुगाऱ्यांवर कारवाई ...
2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर,दि.३० (मिलिंद कांबळे)
शहरलगत असलेल्या मळवटी शिवारातील एका शेडवर छापा टाकून पोलिसांनी 9 जुगाऱ्यांना ताब्यात घेत 2 लाख 6 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अन्य 2 फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
शहरालगत असलेल्या मळवटी शिवारातील एका शेतामधील शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात 09 जणांना ताब्यात घेतले आहे,तर एक फरार व एक जुगार अड्डा चालविणारा इसम अशा दोन इसमांचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 6 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीमध्ये निरंजन वैजनाथ. जाधव,अंबाहनुमान, लातुर,
संभाजी सुगराम शिंदे, काशीनाथ रंगनाथ वाघमारे, दिनकर यशवंतराव गरड,तिघे रा. मळवटी ता.जि. लातुर,
संतोष किशनराव शिंदे, रा. कासारखेडा ता. जि. लातुर संतोष गोरोबा गायकवाड, रा. मळवटी, धनाजी अशोकराव मेहकरे, महादेव बबन मोठेराव, दोघे रा. कोळपा ता.जि. लातुर.शुभम श्रिघर जाधव, वय 28 वर्षे, रा. सुमठाणा ता. रेणापुर जि. लातुर आणि हनमंत दगडु जाधव व स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तिरंट नावाचा जुगार खेळविणारे दत्ता पांडुरंग शिंदे दोघे रा. मळवटी हे फरार आहेत. बेकायदेशिर रित्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे , पोलिस अंमलदार युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment