खरोसा येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

खरोसा येथे  वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

लातूर,दि.१४(मिलिंद कांबळे) 

मौजे खरोसा तालुका औसा  जिल्हा लातूर येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी  वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून  सर्व श्रध्दा संपन्न उपासक उपासिकांसह सर्वांनी या वर्षावास कार्यक्रमाचे श्रवन करावे असे आवाहन खरोसा बुद्ध लेणी येथील भंते सुमेधजी नागसेन यांनी केले  आहे. रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या वर्षावास महोत्सवाला थायलंड, कंबोडिया , व्हिएतनाम येथील जगप्रसिद्ध भंतेजी उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवाला लातूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड,औसा विधानसभा मतदार संघाचे,आमदार अभिमन्यू पवार, उमरगा विधानसभेचे माजी आमदार ज्ञानेश्वर चौगुले, शैलेश दादा उटगे, व्ही एस पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके,डॉ. श्याम लोकरे, प्रा. डॉ. प्रदीप रोडे, संपादक चेतन शिंदे, यांच्यासह चंद्रकांत चिकटे प्रा.अनंत लांडगे, अंकुश ढेरे, अँड जगदीश (दादा) सूर्यवंशी   रजनीकांत कांबळे, यांच्यासह लातूर ,औसा, निलंगा येथील अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. दि.१७ ऑगस्ट२०२५  रोजी होणाऱ्या या भव्य दिव्य वर्षावास महोत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  भंते सुमेधजी नागसेन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..