स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा शेतकरी कामगार पक्षाने दिली...

स्वाभिमानाने जगण्याची उर्जा 
शेतकरी कामगार पक्षाने दिली..

भाई लक्ष्मण सुर्यवंशी 

निलंगा,दि.०७
 
निलंगा तालुक्यातील अन्यायाने पिचलेला शेतकरी , सावकारांच्या पाशात अडकलेल्या बारा बलुतेदारांना मुक्त करण्याचे काम, त्यांना भयमुक्त  आणि स्वाभिमानी जिवन जगण्याची खरी उर्जा शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते भाई अँड श्रीपतराव साळुंखे यांनी दिली आणि हीच परंपरा भाई मधुकरराव सोमवंशी ,भाई विश्वंभरराव पाटील पुढे चालू ठेवली . निलंगा तालुक्यात आजही शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीला मानणारा बहुसंख्य वर्ग आहे असे प्रतिपादन मदनसुरी निलंगा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष भाई लक्ष्मण सुर्यवंशी यांनी केले.या वेळी भाई ॲड सुशील सोमवंशी यांच्या नेतृत्वा खाली परत एकदा निलंगा तालुक्यात लाल झेंडा फडकवण्या चा निर्धार करण्यात आला. चिटणीस मंडळाचे सदस्य भाई अँड उदय गवारे,प्रा. दत्ता सोमवंशी,भाई एकनाथराव कवठेकर, भाई अँड सुशील सोमवंशी, भाई राजेंद्र विहीरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  मदनसुरी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पक्ष ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भाई उदय गवारे यांनी आजही शेतकरी कामगार पक्षाचा विचार आणि ध्येयधोरणे समाज परीवर्तन साठी गरजेचे आहेत असे सांगून केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी निर्णय घेत आहेत त्यामुळे आत्महत्या थांबत नाहीत असे सांगून यापुढील काळात निलंगा तालुक्यातील समविचारी पक्षांना एकत्र करून ग्राम पंचायत व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा मनोदय व्यक्त केला.
     यावेळी भाई राजेंद्र विहीरे यांनी विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम शिंदे यांनी केले.यावेळी भाई मुकेश गायकवाड,काशीनाथ सुर्यवंशी,रत्नजीत जाधव, राजेंद्र माने, अंकुश जाधव,भिवाजी शिंदे, सुमित माने ,हर्ष जाधव ,अभंग जाधव, नवनाथ काकनाळे, शेख चांद, सयाजी सूर्यवंशी, अक्षय माने ,कुमार सूर्यवंशी, संभाजी जाधव, अभिमन्यू लांडगे, धीरज जाधव, मोहन पाटील, रत्नदीप जाधव आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..