औसा तालुक्यात रस्त्याचा नुसताच बोलबाला..
औसा तालुक्यात रस्त्याचा नुसताच बोलबाला,वास्तवात विदारक चित्र
शेतकऱ्यांनां सोसाव्या लागतात मरण यातना
लातूर,दि.०४(मिलिंद कांबळे)
औसा तालुक्यातील शिवली ते उटी या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला गेल्या दोन वर्षापासून इतकी गती आहे की ते काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. या ठिकाणी केवळ काही रस्ता मजबुतीकरण सोडले तर बाकी रस्त्यावर असणारे पूल रस्ता रुंदीकरण आणि रस्त्याची असलेली प्रतवारी याबाबत न बोललेलेच बरे.कारण हा रस्ता मंजूर होऊनही दोन वर्षापेक्षा जास्त काळ होत असल्याचे समजते.परंतु या रस्त्याची कामाची आणि प्रतवारी,प्रगती होत नसल्याचे चित्र सध्या या भागातील शेतकरी नागरिक वर्णन करीत आहेत.
यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे कारण हा रस्ता होत असला असताना या रस्त्याच्या कामामध्ये प्रगती दिसून येत नाही आणि रस्त्यावर रुंदीकरण करण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण न काढताच या रस्त्याचे विकास गुत्तेदार हे रस्ता आणि अतिक्रमण तेथेच सोडून पुढील कामांमध्ये व्यस्त राहतात आणि रस्ता रुंदीकरण आणि केलेल्या अतिक्रमण या बाबीकडे यांचे किंचितही लक्ष नाही सध्या काम सुरू असल्याने हे रस्त्यावर आलेले काही मोजकेच शेतकऱ्यांची अतिक्रमण काढणे आवश्यक आहे कारण त्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या बाजूने होणारी नाली ही बंद करण्यात आलेली आहे त्या बंद केलेल्या नालीमुळे इतर बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी जाऊन त्या शेतीचे नुकसान होत असल्याचे चित्र सध्या या रस्त्यावरील भादा परिसरातील शेतकऱ्यांना दिसून येत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्या कार्यानिमित्त करणे आवश्यक आहे.जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्या अडलेल्या नालीचा त्रास होणार नाही आणि पाणी कोठेही न थांबता ते रस्त्याच्या कडेने नालितून प्रवाहित होईल ही बाब काम करणाऱ्या विकासक,गुत्तेदारांनी लक्षात घ्यावी अन्यथा याबाबत शेतकरी न्याय मागण्यासाठी प्रशासनाच्या दारी बसल्याशिवाय राहणार नाहीत अशी चर्चा या भागात सुरू आहे.
भादा हा लातूर ग्रामीण मध्ये येत असल्याने याकडे विद्यमान आमदार रमेश आप्पा कराड यांनी लक्ष द्यावे अशी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.औसा तालुक्यात ज्या प्रमाणे रस्त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसं प्रयत्न या मतदारसंघात व्हावे अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून आहे.
Comments
Post a Comment