उपजिल्हा रुग्णालयात लॉप्रोस्कोपी शिबिराचे आयोजन

उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे दुर्बिणीद्वारे  लॅप्रास्कोपी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन..

निलंगा,दि.१६ 

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडू अत्याधुनिक दुर्बिणीव्दारे
लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यात अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील, पित्ताशयातील खडे, शरीरावरील गाठी आणि स्तनातील गाठी या आजारावर दि.१८ रोजी नोंदणी व तपासण्या करण्यात येणार आहेत तर १९ ऑगस्ट रोजी लातूर येथील डॉ.निखिल काळे जनरल सर्जन व लॉप्रोस्कोपी तज्ञ, डॉ.निळकंठ  सगर जनरल सर्जन डॉ. दिनकर पाटील भूल तज्ञ ,डॉ.शेषराव शिंदे डॉ. दत्ता  पिनाटे, हे शस्त्रक्रिया करणार  आहेत.या शिबीरामध्ये अत्याधुनिक दुर्बिणीव्दारे केल्या जाणाऱ्या  शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी वेदना होतात. 
या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे  आवाहन डॉ.अर्चना पाटील किर्दक ,उपसंचालक लातूर,प्रदीप ढेले जिल्हा शल्य चिकित्सक लातूर ,डॉ.कुलकर्णी व्हि.डी.कुलकर्णी  वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या वतीने करण्यात  आले आहे.
यासाठी आवश्यक असणारे  कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत यात आयुष्यमान कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड व महात्मा ज्योतीबाफुले योजनेअंतर्गत येणारी सर्व कागदपत्रे तपासणी व नोंदणी
शिबीरात सहभागी होण्यासाठी सागर सांगवे मो. नं. 8275095362  रमण पंडे 9579368073 यांच्याशी संपर्क साधावा .

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..