बंजारा - लमाण समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी..

बंजारा- लमाण समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी...

लातूर,दि.10(मिलिंद कांबळे)

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आता बंजारा समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात होता. त्यामुळे मराठा समाजाला हे गॅझेट लागू होत असेल तर ते बंजारा समाजालाही लागू झाले पाहिजे व एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे,अश्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मराठवाड्यातील बंजारा - लमाण समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटअर (1920) नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्यात यावा मराठवाडा प्रदेश सन 1948 पर्यंत निजाम शाहीत हैद्राबाद राज्याचा भाग होता. त्या काळातील हैद्राबाद 1920 मध्ये लंबाडा,बंजारा,सुगळी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे. बंजारा - लमान समाज मराठवाडा विभागामध्ये मोठा मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे.
गॅजेट मधील उतारा 1920 च्या वरील 
पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिक दृष्ट्या व प्रशासकीय नोंदणी नुसार आदिवासी समाजामध्ये आहे. तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर सण 1956 नंतर या समाजाला ओबीसी एनटीसी प्रर्वर्गात समाविष्ट करण्यात आले परंतु तेलंगणा व आंध्रप्रदेशात या गॅजेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे.
 जरांगे यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाज बांधवांना दिनांक 2 9 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅझेट लागू केले शासन स्तरावर हैद्राबाद गॅजेट सरकारने स्वीकारले व अमलात आले असल्यामुळे त्यांचा आधार घेऊन  मराठवाड्यातील बंजारा- लमान समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात  सामील करून त्यांना या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे..
निवेदनावर
आकाश महादेव राठोड धोंडीराम पवार,वसंत राठोड,वाल्मीक चव्हाण,अर्जुन जाधव प्रकाश चव्हाण बालाजी राठोड अनिल राठोड मारुती राठोड बालाजी राठोड आदी  कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..