एक झुंजार पत्रकार संभाजी कांबळे यांचा आज वाढदिवस....

एक झुंजार पत्रकार...
आयु.संभाजी कांबळे यांचा आज वाढदिवस...
--------------------------
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.समाजात काय चालले आहे याचे सविस्तर वृत्तांत  पत्रकार हा समाजापुढे मांडत असतो. समाजाच्या जाणिवा पत्रकारांमध्ये ओतप्रत भरून असतात. त्या जोपासण्याचे काम करीत लोकांना न्याय देण्याचे काम सतत पत्रकार करीत असतात.असेच एक झुंजार पत्रकार आयु.संभाजी कांबळे होत. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याची  ओळख करून देणारा हा छोटासा लेख...
आयु.संभाजी जळबाजी कांबळे  यांचा जन्म दि.15 सप्टेंबर रोजी सामान्य कुटुंबात झाला. ते ऊच्य शिक्षित असून त्यांनी एम ए, बी. जे ,एम जे या पत्रकारितेच्या उच्य पदविका प्राप्त असून विद्यार्थी दशेपासूनच संभाजी कांबळे हे  सामाजिक न्यायासाठी जमिनीवरील लढाया लढणारा लढाऊ पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे..
त्यांनी महाराष्ट्रात अग्रगन्य बहुजनांचा आवाज असणाऱ्या दैनिक वृत्तरत्न सम्राट(मुंबई) या वृत्तपत्रात मागील 20 वर्षापासून  लिखाण केलेले आहे. वृत्तपत्रात सातत्याने लिखाण करून  राजकीय, दलित, शोषित,पीडित  यांच्यावरील होत असलेल्या अन्यायावर वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रहार करून अन्यायाला वाचा फोडण्याचे कामही त्यांनी केलेले आहे. ते दलित विद्रोही साहित्याचे वाचक आहेत...
आयुष्यमान संभाजी  कांबळे यांनी गेल्या  २० वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लिखाण करून जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले.फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचाराशी बांधील असलेल्या अनेक युवकांना चळवळीत कार्य करताना लिखाणाच्या माध्यमातून प्रोत्साहन देवून चळवळ वाढीस नेण्यासाठी सहकार्य केले. लोकसंख्या समस्या,बेटी बचाव बेटी पढाव, व्यसनमुक्ती, दारूबंदी, वृक्षलागवड,अंधश्रद्धा  अशा शासनाच्या लक्षवेधी कार्यक्रमा संदर्भात त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून वेळोवेळी लिखाण केलेले आहे..
आयु.संभाजी कांबळे यांना नांदेड जिल्ह्यासह सह लातूर जिल्ह्यात सामन्याचा आवाज  म्हणून ओळखतात...
आयु. संभाजी कांबळे हे एक  झुंजार पत्रकार असून लेखणीसोबत पाठपुरावा करून ते न्याय मिळवून देत असतात. प्रशासन व राजकिय लोकांवर त्यांची जरब असून एक झुंजार पत्रकार म्हणून  याभागात त्यांचा दबदबा आहे. त्यांनी स्वतः पत्रकारिता करीत करीतच इतर अनेक युवकांना पत्रकारितेत आणले.ते आज चांगले लिखाण करीत असतात...
आयु.संभाजी कांबळे यांनी केलेल्या उत्कृष्ट पत्रकारिते बद्दल ते अनेक पुरस्कार प्राप्त असून त्यात प्रामुख्याने  मूकनायक शताब्दी महोत्सवा निमित्त पुणे येथे त्यांना मूकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती निमित्त जयभीम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
युग कवी वामनदादा कर्डक व प्रताप सिंग बोधडे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त तुफानातील दिवे 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पुरस्काराने ही  सन्मानित करण्यात आले आहे.
आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे सर्वांशी मिळून मिसळून वागावे सर्वांशी प्रेमाने वागावे लहान असो मोठा असो प्रत्येकाचा आदर करावा प्रत्येकाने दानाला महत्त्व द्यावं आपणही समाजाचे देणे लागतो हीच उदात भावना मनामध्ये कायम असायला हवी असा अट्टाहास ते नेहमी करतात. राजकीय, दलित, शोषित,पीडित  यांच्यावरील होत असलेल्या अन्यायावर वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रहार करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केलेले आहे. ते दलित विद्रोही साहित्याचे वाचक आहेत अनेक पुरस्कार त्यांचे नावे आहेत..
जीवनात आई - वडील, छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा बसवेश्वर ,महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे,यांच्यासह सर्वच महापुरुषांना आदर्श मानणारे आयु.संभाजी कांबळे  यांना भविष्यात लेखणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरीब, तळागाळातील लोकांना न्याय  मिळवून द्यायचा आहे. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना खूप साऱ्या  शुभेच्छा ...

मिलिंद कांबळे ,निलंगा लातूर
सम्राट लातूर जिल्हाप्रतिनिधी 
मो.9960049411

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..